शबरी चि गोष्ट
- Pradnesh
- Apr 17, 2021
- 2 min read
Note:- This story is in Marathi.
This story dose not have any illustration.
शबरी चि गोष्ट
राम आणि लक्ष्मण सीतेला शोधत शोधत भारद्वाज ऋषिंच्या आश्रमाच्या जवळ आले.
तिथे शबरी नावाची रामाची भक्त खूप वर्षांपासून रामाची वाट पहात होती.
कारण भारद्वाज ऋषिंनी सांगितल होत की तिथे काही वर्षांनी श्री राम येणार आहेत व शबरी ला त्यांचे स्वागत करायच आहे.
राम येणार आहेत म्हणून तीला खुप आनंद झाला.
मग तिनी आश्रम स्वच्छ केला, अंगणात सडा घातला, सुंदर रांगोळ्या काढल्या, रामाची पूजा करण्यासाठी पाणी आणलं, जंगलातुन फुलं आणली आणि रामाच्या गळ्यात घालण्यासाठी हार तयार केला. मग श्री रामांना बसण्यासाठी तिने आसन आणून ठेवले. मनासारखी तयारी झाली म्हणून शबरी खूप खूश झाली तेवढ्यात तिला आठवलं की आपण त्यांना नाश्तासाठी काय द्यायच?
मग ती पुन्हा जंगलात गेली आणि सुंदर बोर तोडून आणली.
पण तिला शंका आली की ही बोर नक्कीच गोड असतील ना की नाही? तिने एका बोराची चव घेतली ते आंबट होतं. ते बोर तिने फेकून दिले. तिने दुसऱ्या बोराची चव घेतली ते गोड होतं म्हणून तिने ते रामासाठी ठेवून दिलं अशी तिने सगळया बोरांची चव पाहिली आणि गोड बोर रामासाठी ठेवली.
राम आश्रमात आल्यावर शबरीने रामाची पूजा केली आणि त्याला बोर खायला दिली. उष्टी बोरे पाहून लक्ष्मणाला राग आला पण रामने आनंदाने बोरे खाल्ली. रामाने शबरीला आशीर्वाद दिला. मग शबरीला धन्य वाटल.आश्रमाच्या बाहेर निघाल्यावर लक्ष्मणांनी रामाला विचारलं तू उष्टी बोर का खाल्ली ती पण इतक्या आनंदाने? त्यावर रामाने उत्तर दिले:- मला ती बोर उष्टी दिसली नाही. तिच्या मनातलं प्रेम आणि भक्ती दिसली. म्हणून मी बोर आनंदाने खाल्ली. भोळ्या शबरीची भोळ्या भक्ताला मी कसं नाकारू?
प्रश्न: - यातून आपण काय शिकलो?
उतर: - आपण शिकलो की
1. देव आपल प्रेम पहातात.
2. आपल्या मनातला भाव ओळखतात.
3. प्रेमनी भक्त जे जे देईल ते देव आनंदाने स्वीकारतात मग ते पान, फूल, पाणी किंवा काहीही असो!
Comments